
नांदेड | नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश भाऊराव पावडे यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट रोज शुक्रवारी सकाळी १० वाजता ‘खोके’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्ते व जनतेने मो’्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजेश पावडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.


सदरील आंदोलनस्थळी नांदेड लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी.आर.कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ‘खोके’ आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविणे, राज्य सरकारला सर्व समस्यांवर जाब विचारणे, आंदोलनावेळी सरकारविरुध्द नारेबाजी व निदर्शने करणे, समस्या निवारण पेटी (खोके) हे सर्व मतदार संघामध्ये फिरुन लोकांच्या समस्या त्यात टाकुन ते ‘खोके’ मुख्यमंत्र्यांना पा’विले जाणार आहेत. आज होणार्या आंदोलनात जनतेने मो’्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश भाऊराव पावडे यांनी केले आहे.




