HomeकरियरBest Vishnupuri School of Priyapurak School : पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे...

Best Vishnupuri School of Priyapurak School : पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा; रिप बेनिफिट संस्थेचे प्रतिपादन – NNL

नांदेड| तीन एकरच्या परिसरात निसर्गरम्य हरित लता, वेली, वृक्ष, डौलणारी फुलझाडे, विस्तृत पसरलेले गवताचे मैदान, वाढलेली झाडे आणि चिमुकल्यांचा वावर पाहून पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा असे गौरोद्गार रिप बेनिफिट संस्थेने काढले आहेत.

नांदेड जिल्ह्यात पर्यावरण प्रेमी शिक्षकांना भरीव मार्गदर्शन करण्यासाठी रिप बेनिफिट संस्थेच्या चंद्रिका, अक्षय,शिवानी व भरत यांच्यासह समग्र शिक्षा अभियानचे सहायक कार्यक्रमाधिकारी विलास ढवळे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विष्णुपूरीस भेट देण्यासाठी आले होते. यावेळी शाळेतील पर्यावरणपुरक रचना पाहून समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी रिप संस्थेच्यावतीने शालेय परिसरात एका बहुवार्षिक रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. रिपने पर्यावरण प्रेमी शिक्षक उदय हंबर्डे यांना पुढील कार्यासाठी निवडून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी व कृष्णा बिरादार यांनी शाळेतील पर्यावरणपुरक प्रकल्पांची माहिती दिली. शाळेतील पर्यावरणपुरक रचना पाहून समाधान व्यक्त केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments