Wednesday, May 13

लोटस् हॉस्पिटल राष्ट्रीय आरोग्य अभियान व बाल स्वास्थ्याच्या सूचित…! NNL

नांदेड। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा एक महत्त्वाचा उपक्रम नॅशनल हेल्थ मिशन द्वारे राबविण्यात येत असून या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण ३६ जिल्ह्यामधील जन्मापासून तर १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ४ ‘डी’ म्हणजे जन्माच्या वेळी दोष, कमतरता, रोग, अपंगत्वासह, विकास विलंबन आदींसह त्यांच्यातील या विकृती कमी करून त्या मुलांचे जीवनमान सुधारुन त्यांना सामान्यपणे जगण्यासाठी निरोगी बनविणे हे आहे.

या उद्देशामध्ये हातभार लावण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोटस हॉस्पीटल ने समोर येत शहरात पहिले राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सूचीबद्ध रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे त्यामुळे या योजनांचा चा लाभ घेण्यासाठी पालकांची व चालक रुग्णांची सुलभ सुव्यवस्था झाली आहे.

आता या सेवांसाठी ईथल्या पालकांना मुंबई -पुणे या यासारख्या ठिकाणी जाऊन प्रतिक्षा करण्यात वेळ दवडण्याबरोबरच त्यांना जाण्या-येण्यात इलाजाचा मुख्य वेळ वाया जात होता त्यासोबतच पालक व बालक यांना घ्यावी लागणारी हजारो किलोमीटर प्रवासाची रिस्क आणि त्यासाठी लागणारा पैसा व होणारी अडचण लक्षात घेत.

IMG 20240805 WA0065 लोटस् हॉस्पिटल राष्ट्रीय आरोग्य अभियान व बाल स्वास्थ्याच्या सूचित...! NNL

नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. निळकंठ भोसीकर आणि लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय पडलवार यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि नॅशनल हेल्थ मिशन यांच्या फॅमिली वेल्फर आणि स्टेट इन्शुरन्स सोसायटी यांना प्रस्ताव पाठवला होता त्यांचा या दूरदृष्टीला पाहून राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि नॅशनल हेल्थ मिशनच्या डायरेक्टरांनी लोटस हॉस्पिटलला मान्यता दिली असून आता लोटस हॉस्पिटल नांदेड हे आता नॅशनल हेल्थ मिशन आणि आर बी एस के राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम च्या आरोग्य सेवांसाठी सूचीबद्ध झाले आहे.

IMG 20240805 WA0066 लोटस् हॉस्पिटल राष्ट्रीय आरोग्य अभियान व बाल स्वास्थ्याच्या सूचित...! NNL

लोटस हॉस्पिटल संचालक व आर बी एस के नांदेड कडून सर्व गरजू रुग्णांना व पालकांना आवाहन करण्यात येते की यापुढे हृदय जन्मदोष असणाऱ्या सर्व जन्मापासून तर १८ वर्ष वयापर्यंतची सर्व बाळांचा उपचार, निदान शस्त्रक्रिया हे लोटस् हॉस्पिटल येथे करता येणार आहेत अशी माहीती लोटस् हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय पडलवार यांनी दिली आहे.

खालील आजारांवर मिळणार उपचार … नांदेड जिल्ह्यातील सर्व रुग्णांना आपल्या जिल्ह्यातच लोटस हॉस्पिटल येथे २ डी ईको, एएसडी, व्हिएसडी, पिडीए, बायपास, वॉल्ह्व सर्जरी यासारख्या हृदय विकाराचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया डॉक्टर लाईन येथे लोटस हॉस्पिटल मध्ये करण्यात येतील तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.

लोटस हॉस्पीटल येथे २००७ पासुन हृदयरोगावरील प्रोसीजर व शस्त्रक्रिया केल्या जातात आजपर्यंत हजारो बालक व प्रौढ रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणारे विशेष तज्ञ डॉक्टरर्स टीम व अनुभवी पॅरामेडीकल स्टॉफ तसेच लागणारे सर्व साहित्य व इन्स्फास्ट्रक्चर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :: लोटस हॉस्पिटल, दुसरा मजला, डॉक्टर्स प्लाझा, डॉक्टर्स लेन, नांदेड. फोन : 02462-246677 मो. 7057981987

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!