उस्माननगर l प्रति वर्षाप्रमाणे यंदाही उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार श्री सिद्धेश्वर शिव मंदिरात ५६ वा अखंड शिवनाम सप्ताह श्री संत शिरोमणी शिवयोगी मन्मथस्वामी यांच्या कृपेने व श्री गुरुवर्य १०८ ष. ब्र. शिवाचार्य रत्न सांब शिवाचार्य महाराज व श्री गुरुवर्य १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या प्रेरणेने तथा श्री वैजनाथ स्वामी व शिवहार स्वामी यांच्या हस्ते दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी अत्यंत उत्साहात प्रारंभ होणार आहे. तसेच दिनांक २५ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने सांगता होणार आहे.. यादरम्यान मा.खा.श्री.अजित गोपछडे ( राज्यसभा सदस्य) , कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.


या अखंड शिवनाम सप्ताहास श्री गुरु १०८ ष.ब्र. शिवाचार्य रत्न सांब शिवाचार्य महाराज , थोरला मठ वसमत , श्री. गुरू १०८ ष. ब्र. डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज लासींनामठ पुर्णा , श्री गुरु १०८ ष. ब्र. रुद्रमुनी शिवाचार्य महाराज मुदखेड , श्री गुरु १०८ ष. ब्र. वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत , श्री.गुरू १०८ ष.ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर . या कार्यक्रमासाठी गुरुवर्यांची उपस्थिती व अमृत उपदेशाचा लाभ होणार आहे.

यावेळी सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे पाच ते सहा शिवपाठ , सहा ते सात श्री सिद्धेश्वर अन्नदात्याकडून रुद्र अभिषेक , ९ ते ११ ग्रंथराज परमरहस्य पारायण , ११ ते १ प्रवचन १२ते ३ सकाळचा प्रसाद , चार ते पाच गाथा भजन , पाच ते सहा शिवपाठ , रात्री ९ वा . ते ११ शिव किर्तन ११ ते १२ गुरुवर्याचे प्रवचन १२ ते १ शिवजागर होईल.

अखंड शिवनाम सप्ताहातील नामवंत कीर्तनकार म्हणून दिनांक १८ फेब्रुवारी मंगळवारी प्रवचनकार शि.भ. प. श्री. सिद्धेश्वर स्वामी नांदेड तर कीर्तनकार म्हणून शि. भ.प. श्री त्र्यंबक महाराज नंदगावकर , दि. १९ बुधवारी प्रवचनकार शि.भ.प. सौ. प्रणिता रवींद्र देशपांडे छत्रपती संभाजीनगर तर किर्तनकार रात्री शि.भ.प. धनराज बुलबुले लातूर , दि.२० फेब्रुवारी गुरुवारी प्रवचनकार शि.भ.प. श्री हनुमंतराव नवले गुरुजी बामणी , तर कीर्तनकार शि.भ.प. बालाजी पोटजळे काकांडीकर , दि.२१ फेब्रुवारी शुक्रवारी प्रवचनकार शि.भ.प. श्री शिवराज गोदरे स्वामी बारसगाव , रात्री कीर्तनकार म्हणून लक्ष्मण विभुते गुरुजी लातूर , दि. २२ फेब्रुवारी शनिवारी प्रवचनकार शि.भ.प. मारोतराव नेळगे खेडकरवाडी तर कीर्तनकार म्हणून शि.भ.प. श्री मोहनराव कावडे हसनाळीकर.

दि.२३ फेब्रुवारी रविवारी प्रवचनकार म्हणून शि.भ.प. पूज्य अवधूत बन महाराज लाटकर , तर कीर्तनकार म्हणून शि.भ. प. सौ. कीर्तीताई वीरभद्र हिरेमठ लातूर , दि २४ फेब्रुवारी सोमवारी टाळ आरती किर्तनकार शि.भ.प. शिवानंद महाराज दापशेडकर , तर किर्तनकार म्हणून शि.भ.प. भगवंतराव पाटील चांभरगेकर आणि दि.२५ फेब्रुवारी रोजी मंगळवारी प्रसादावरील शिव किर्तन श्री गुरु युवा संत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमतकर यांचे प्रसादावरील कीर्तन होईल. याप्रसंगी मान्यवर मंडळींचे सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले आहे.
यामध्ये मा. खा. श्री. अजित गोपछडे ( राज्यसभा सदस्य) , कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज बाधव व गांवकरी उस्माननगर मोठी लाठ यांनी केले आहे.