नांदेड| “पोलीस स्टेशन इतवारा गुन्हे शोध पथकाने गौण खनीजाची चोरटी विक्री करणारे ईसमा विरुध्द कारवाई करुन ५,०३००० रु चा मुद्देमाल केला जप्त करून इतवारा गुन्हे शोध पथकाने दमदार कामगिरी केली आहे. यामुळे अवैध्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहते.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध गोण खनीज, चोरटी वाहतुक करणारे व्यक्ती व वाहना विरुध्द कारवाई करणे वावत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक ०८/०२/२०२५ रोजी इतवारा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली.

मरघाट कमानी जवळ चौफाळा नांदेड येथुन एक इसम शासनाची रॉयलटी न भरता विना परवाना बेकायदेशीर रित्या गोण खणीन (रेती) ची चोरटी वाहतूक करीत आसल्याने सदर ठिकाणी जावून छापा मारला असता एक टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा टेम्पो क्र. एम. एच ०४ ई एल ५०१२ किमंती ५,०००००/- रु आत मध्ये अर्धा ब्रास रेती किमंती ३,०००/- रुपयाची असा एकुण ५,०३०००/- रुपयाचा माल मिळून आल्याने जप्त करुन आरोपी सतीश धोंडीराम गवते वय ३२ वर्षे व्यवसाय चालक रा. ब्रम्हपुरी चौफाळा नांदेड कायदेशीर कारवाई केली आहे.

हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक पो. स्टे. इतवारा, नांदेड, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि गायकवाड, पोहेको धर्माजी कस्तुरे, पोटेकों. एकनाथ मोकले, पोको. कोरनुळे, पोको. जावेद सर्व नेमणुक पो.स्टे इतवारा, नांदेड यांनी केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे पो. स्टे. इतवारा हे करीत आहेत. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
