नवीन नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुक साठी व दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणूक साठी 312 मतदान केंद्रावर 3 लाख 15 हजार 248 मतदार मतदानाचा हक्क 20 नोव्हेंबर रोजी बजावणार आहेत.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील 312मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, यात पुरुष मतदार 1लाख61,हजार 130तर महिला मतदार 1लाख 54हजार 113 व तृतीय पंथी 5 व सैनिक 231,अशा 3लाख 15हजार 248 मतदाराचा समावेश आहे.
नांदेड दक्षिण डॉ.सचिन खल्लाळ निवडणूक अधिकारी म्हणून हे काम पहात असुन पर्यवेक्षक,बिएओ मार्फत मतदारांना पोलचिट वाटप करण्यात येत आहेत, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 126 व ऊतर विधानसभेचे 15 मतदान केंद्र असुन तिन ठिकाणी चेक पोस्ट तपासणी नाके उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.