Wednesday, May 13

illegal sand : नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे 12 लाख रुपयाचे 3 इंजिन जप्त

नांदेड| नांदेड तालुक्यातील मौजे कल्लाळ बोरगाव येथे गोदावरीनदीमध्ये अवैध वाळू उपसा करणारे 3 इंजिन जप्त करून क्रेनच्या साह्याने तहसील कार्यालयामध्ये रात्री उशिरा आणण्यात आले. ज्याची किंमत अंदाजे 12 लाख रुपये आहे.

गोदावरी नदीमध्ये शासनाच्या अधिकृत वाळू डेपो शिवाय कोणी उत्खनन करून आढळून आल्यास यापुढे सुद्धा करून आवश्यकता पडल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रशासनातर्फे गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत सांगण्यात आले. महसूल विभागाने केलेली ही धाडसी कारवाई समजली जाते.

FB IMG 1738768600993 illegal sand : नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे 12 लाख रुपयाचे 3 इंजिन जप्त

याकामी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वरकड यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी नहणू कानगुले, कुणाल जगताप, राजेंद्र शिंदे, ग्राम महसूल अधिकारी रणवीरकर, खेडकर, कदम, सकवान, माधव भिसे इत्यादी सहभागी होते.

475086919 1151756436327090 5679892149495449898 n illegal sand : नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे 12 लाख रुपयाचे 3 इंजिन जप्त

वाळू माफियांवर महसूल व पोलीस विभागाकडून कारवाई सुरु आहे, अवैध वाळू उपसा घाट असलेल्या नदीपात्रात कार जात नसल्याने पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी थेट दुचाकीवर जाऊन सहकार्‍यांसह कारवाई केली आहे. त्यांच्या धंदे कार्यवाहीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

475981989 1151756402993760 7021647884400125235 n illegal sand : नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे 12 लाख रुपयाचे 3 इंजिन जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!