नांदेड| जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ३१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यान मध्ये विजयकुमार सोपानराव भरणे अपक्ष,अॅड. रामदास शिवराम दरणे अपक्ष, बाबुराव विश्वनाथराव मुनेश्वर अपक्ष,शेख जाकीर शेख महंमद चाऊस रिपब्लिकन सेना ,अब्दुल समदखान हाजी जलालखान अपक्ष, वैशाली मारोतराव हुके पाटील अपक्ष ,डॉ.रेखा दत्तात्रय चव्हाण अपक्ष, अॅड.मारोतराव कानोबाराव हूके पाटील अपक्ष,विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर अपक्ष,निळकंठ मुकुंदराव कल्याणकर अपक्ष, रमेश माधवराव नरवाडे अपक्ष, गणपत प्रकाशराव पवार अपक्ष ,करण उत्तमराव गायकवाड अपक्ष, उत्तम रामा गायकवाड अपक्ष,
प्रकाश रामा घुन्नर अपक्ष, सुभाष मारोतराव जाधव अपक्ष, दिलीप आला राठोड वंचित बहुजन आघाडी, बालाजी भगवान पऊळ अपक्ष,अन्वरखान नुरुद्दीखान अपक्ष,श्रीनिवास वैजनाथ पोतदार अपक्ष,संभाराव उर्फ बाबुराव गुणाजीराव कदम शिवसेना शिंदे गट,नेहा माधवराव पवार भा. रा. काँग्रेस,माधवराव निवृत्तीराव पवार भा.रा. काँग्रेस,दिनेश विजय श्रीरामज्वार अपक्ष, अशोक पांडुरंग राठोड अपक्ष,अनिल दिगंबर कदम अपक्ष.
आज १७ व्यक्तीनी २२ अर्जाची उचल केली आहे तसेच आज २७ व्यक्तिनी कडून २ लाख ३५ हजार रुपये अनामत रक्कम प्राप्त झाली असून आजपर्यत ३३ जनांनी ४० नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत तर आत्तापर्यत १२९ व्यक्तीनी २२० अर्जाची अचल केली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा नांदे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर मिडिया कक्षातून ए.एम.तामसकर अनिल दस्तूरकर यांनी कळविले आहे.