हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील २० गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविन्यात आली आहे. हि बाब हिमायतनगर तालुक्यासाठी भुशनावह असून, याचा आदर्श सर्व गावातील नागरिकांनी घेवून पुढील वर्षी जास्तीत जास्त गावकर्यांनी लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला एकसंघतेचा उद्देश सफल करावा. असे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी केले. ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात गणेशाची स्थापना केल्यानंतर बोलत होते.
गणेश चतुर्थी मुहूर्तापासून हिमायतनगर शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. धार्मिक सन – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जवळपास १११ ठिकाणी गणपती स्थापन केलेल्या मंडळाच्या भेटी घेऊन तसेच पोलीस स्थानकात शांतता कमिटीच्या बैठक घेऊन शांततेत उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील हिंदू – मुस्लिम एकतेची परंपरा गेल्या ५३ वर्षांपासून कायम असून, सामाजिक शांतता व बंधुभावाची परंपरा जोपासत सन- उत्सव साजरे केली जातात. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येउन उत्सव साजरे करतात याची मला जान आहे.
दरवर्षी दुष्काळ परिस्थिती वाढतच आहे, या काळात सन उत्सव सार्वजनिक रित्या आणि एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवून साजरे करने आणि विशेषतः पर्यावरण पुरक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाने डीजे, डॉल्बी सिस्टीम, कर्णकर्कश आवाजावर बंदी घातलेली आहे. केवळ ७५ डिसेबल पर्यंतच्या आवाजाला परवानगी असल्यामुळे मंडळांनी कमी आवाजाचा भोंगा वापरून धार्मिक गीतातून उत्सव साजरा करावा. जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. यामुळे ध्वनीप्रदूषण होऊन दुसर्यांना त्रास होणार नाही याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी अश्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
यंदा गतवर्षीच्या तुलनेत गणेश मंडळाच्या सांख्येत वाढ झाली असून, हिमायतनगर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातून १११ गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. आमच्याकडे परवान्यासाठी अनेकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी पिंपरी, खैरगाव तांडा, ताडाची वाडी, भिश्याची वाडी, डोल्हारी, सिरपल्ली, वारंगटाकळी, धानोरा, सिबदरा, खैरगाव, वाशी, पार्डी, दिघी, वाघी, आदीसह २० गावात एक गाव एक गणपती तर इतर गावात ६३ अशी एकूण ८३ गणेशाची ग्रामीण भागात स्थापना झाली आहे. त्यातील परवाना घेतलेले ६३ आणि विनापरवाना २० गणेशमंडळ असे एकुण ८३ तसेच मंडळ ग्रामीण भगत आहेत.
हिमायतनगर सारख्या एकट्या शहरात जवळपास २८ ठिकाणी मुर्त्या स्थापन करण्यात आल्या असून, त्यापैकी १४ गणेश मंडळाने परवान्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. तर १४ विना परवाना मुर्त्यांची स्थापना झाली असून, श्री गणेश उत्सव स्थापना २०२४ अनुषंगाने शहरी आणि ग्रामीण मिळून परवाना धारक ७७ गणेशमंडळ आणि विनापरवाना ३४ गणेशमंडळ आहेत. त्यांनी सुद्धा तात्काळ परवानग्या घेऊन आनंदाने उत्सव साजरा करावा. उर्वरित मंडळांनी परवानग्या न घेतल्यास गणेश मंडळाची संख्या कमी -अधिक होईल अशी माहिती डीएसबीचे कमलाकर सदावर्ते यांनी दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेत गणेशोत्सव पार पडावा म्हणून पोलिस निरीक्षक अमोल भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुद्दे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, २५ पोलीस कर्मचारी, २० होमगार्ड, ५ नवप्रशिक्षणार्थी, आदी ५० हून अधिक पोलिसांचे शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचालन (रूट मार्च) करण्यात आले. गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवशी १ गणेश मंडळ, ७ व्या दिवशी ३ गणेश मंडळ, नवव्या दिवशी १० यात पोलीस ठाण्यातील गणपतीचा देखील समावेश असून, शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला उर्वरित गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.