HomeनांदेडNanded Collectorate Office : 100 दिवसांचा कृती आराखडा; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम...

Nanded Collectorate Office : 100 दिवसांचा कृती आराखडा; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी

नांदेड|100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्याचा निकाल काल जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने 66.86 गुण मिळवून राज्यात पाचवा तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. तर राज्यात परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक कार्यालयामध्ये नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 61.14 गुण मिळवून सर्वोत्तम कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकाविला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक कार्यालयाला 100 दिवसांचा कृती आराखड्यानुसार कार्यालयीन सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले होते. या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांचा भारतीय गुणवत्ता परिषद कॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत या मोहिमेचे मुल्यमापन करण्यात आले आहे.

यामध्ये संकेतस्थळ अद्ययावत, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी-सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणाली, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रीम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम या निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्याचा निकाल काल १ मे रोजी जाहिर झाला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments