हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदाराच्या भरारी पथकावर बुधवारच्या राञी वायफना शिवारात काहींनी हल्ला केल्याने महसुल कर्मचा-यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा हदगाव तालुका महसुल कर्मचारी संघटनाद्वरे निषेध करण्यात आलेल आहे.
या बाबतीत समजलेली माहीती अशी की, दि.21 डिसेंबर 2022 राञी 7वाजेच्या दरम्यान उपविभागातील नायब तहसिलदार भगवान बाबाराव हंबर्ड हे अवैध उत्खनन व वाहतूक पथकात कर्तव्यवर असतांना तामसा सर्कल मधील वायफना शिवारात त्यांच्या पथकाच्या वाहनावर गजानन मारोती दुधाळे, शामसुंदर माने, साईनाथ हुडेकर व राहुल हुडेकर यांनी नायब तहसिलदार व पथकातील वाहन चालक याच्यावर हल्ला करुन पथकातील वाहनाचे नुकसान करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. असे नायब तहसिलदार यांनी तामसा पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे. यावरुन तामसा पोलिसांनी वरील व्यक्ती विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहे.
तालुका महसुल संघटना आक्रमक ..
उपविभागातील भरारी पथकावर भ्याड हल्याचा तालुका महसुल कर्मचारी संघटना द्वरे उपविभागीय अधिकारी हदगाव यांना निवेदन देवून तिव्र निषेध करण्यात आला.
वाहनच्या प्रखर प्रकाश मुळे घटना …
आम्ही सर्वसामान्य शेतकरीअसुन आमच्या कडे रेती काढण्याचे कोणते सहीत्य किवा इतर वाहने सुद्धा नाहीत. आम्ही अवैध रेतीचा उपसा कसे करणार अस आरोपीचे म्हणने आहे. क्षुल्लक कारणांमुळे सदर घटना घडली असुन, नायब तहसिलदारच्या पथकाच्या वाहनाचे प्रखर लाईटच्या प्रकाशामुळे ञास होत असल्याने सांगताच पथकातील वाहन चालकाची तु -तु मै.झाली विशेष म्हणजे संबंधित पथकातील अधिका-याकडे शासकीय आयकार्ड किवा शासकीय वाहनावर कोणत्याही प्रकारचे शासकीय पाटी किवा नाव दिसुन आलेल नाही. केवळ गैरसमजीतुन ही घटना घडली असल्याचे आरोपी कडुन सागण्यात आलं.