नांदेड। मोटार वाहन कायदा व अनुषंगीक नियमांमध्ये नमूद अनुज्ञप्ती विषयक कामांसाठी आवश्यक असलेला नमुना-1 (अ) हे वैद्यकिय प्रमाणपत्र पात्र डॉक्टरांमार्फत (नोंदणीकृत एमबीबीएस वैद्यकीय व्यावसायिक किंवा त्यावरील अर्हता प्राप्त) ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यातील 11 वैद्यकीय व्यवसायिकांनी युजर आयडी प्राप्त करुन घेतला आहे. नागरिकांनी अनुज्ञप्तीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना-1(अ) प्राप्त करण्याकरीता त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
वैद्यकीय व्यवसायिकाचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. डॉ. हिरामन अळणे अक्षय क्लिनिक, डॉक्टर लेन नांदेड 9850607800. डॉ. प्रशांत खंडागळे अविरत मॅर्टनीटी हॉस्पिटल मुखेड, नांदेड 7588914659. डॉ. अब्दुल राफे हेल्थ केअर क्लिनिक, हतई, नांदेड 9552587336. डॉ. मो. रिजवान पॉप्युलर हॉस्पीटल, देगलूर नाका, नांदेड 9764889980. डॉ. अजिंक्य पुरी ओम क्लिनिक, वाई बाजार माहूर, नांदेड 9420446389. डॉ. विजय बरडे, बरडे डायबीटीज हॉस्पीटल,भावसार चौक नांदेड 7020762727. डॉ. अब्दुल समी डॉ जावेद क्लिनीक, वाघी रोड, नांदेड 8446953633. डॉ. लालू बोरडे मोतोश्री मल्टी क्लिनीक,
छत्रपती चौक नांदेड 9359807675. डॉ. आफरीन फातेमा पटेल राहत आय हास्पीटल, हैदरबाग, नांदेड 9970055334. डॉ. सारिका देशपांडे श्री हॉस्पिटल, गणेशनगर, नांदेड 7709485995. डॉ. भीमराव जोंधळे जोंधळे हॉस्पीटल, सिडको, नांदेड 7030322356 याप्रमाणे आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना-1 (अ) प्राप्त करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.