मुक्रमाबाद| मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील तरुण शेतकरी असलेले धनराज गंदीगुडे यांनी अत्यंत अल्प कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेती केली. आणि स्वतःसह इतर शेतकऱ्यांनाही सहकार्य करत शेती क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.


राजलक्ष्मी हायटेक नर्सरीचे मालक धनराज महादेव आप्पा गंदीगुडे यांना नामांकित सिजेंटा कंपनीच्या वतीने ‘स्टार चॅनल अवार्ड २०२४’ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी सिजेंटा कंपनीचे नांदेड जिल्हा प्रमुख हर्षल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. धनराज गंदीगुडे या तरुण शेतकऱ्याचा सत्कार व सन्मान करण्यात आल्याने त्यांचे कौतुक केले आहे.


