हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.


याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर एल बी डोंगरे सर हे होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात व या दिवशी सर्वजण आदिवासी बांधव एकत्र येतात. आणि आपल्या आपल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा घालतात, गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी जागतिक दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पूजन केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम म्हणाल्या की जागतिक आदिवासींच्या हक्काचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस पाळला जातो. तुम्ही स्वदेशी समुदयाशी किंवा स्थानिक स्वदेशी संस्थेच्या संपर्कात राहून किंवा तुमच्या नातेवाईक आणि मित्रासह तुमचे स्वतःचे उपक्रम आयोजित करून भाग घेऊ शकता व जागतिक आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय दशक 1995 ते 2004 पर्यंत असे 21 डिसेंबर 1993 च्या ठरावात घोषित केले होते.



ज्यांचा मुख्य उपदेश अशा क्षेत्रामध्ये आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्यांचे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे हा आहे. असा मोलाचा संदेश बोलताना दिले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.डी सी देशमुख सर होते व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ.डी के कदम सर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



