नांदेड। गाव कचरामुक्त ठेवण्याची सर्व ग्रामस्थानीची जबाबदारी असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले. स्वच्छता ही सेवा मोहिमे अंतर्गत आज लोहा तालुक्यातील पिंपळगाव येवला येथे घेण्यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर सरपंच तुळसाबाई गोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, रमेश पाटील तोनचिरे आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी दिले असले तरी, उघड्यावर कचरा टाकणे, उघडयावरील शौचविधी व पाण्याचे साचलेले डबक्यांमुळे गावातील वातरण प्रदूषित होते. जर यासाठी गावक-यांनी मिळून आठवड्यातून एकदा ग्रामसफाई कली जर परिसराची स्वच्छता होवून दूषित वातावरणामुळे पसरणारे रोग कमी होतील व नागरिेांचे आरोग्य सुधारेल असेही त्या म्हणाल्या. यावेळी सीईओ कनवाल यांनी पर्यावरण संरक्षणासाठी गावात प्लास्टिक मुक्ती करावी. सिंगल युज प्लास्टिकच्या ऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे महत्वही त्यांनी स्पष्ट केले.
प्रांरभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ओला व सुका कचरा व्यवस्थापणा साठीच्या ट्रायसायकलचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छतेसाठी श्रमदान व वृक्षलागवड करण्यात आली. कार्यक्रमात स्वच्छ माझे अंगण अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी उपस्थितांना स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मिलिंद व्यवहारे यांनी स्वच्छतेची शपथ दिली.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही त्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या परसबागेचे कौतुक त्यांनी केले. सुरवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाव्दारे उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला शंकरराव सावळे, नागोराव येवले, मुरलीधर येवले, साहेबराव तोनचिरे, जिल्हा परिषदेचे अल्केश शिरशेटवार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीयसहाय्यक शुभम तेलेवार, मिलिंद व्यवहारे, विस्तार अधिकारी रोहिदास टेंभूर्णे, ग्रामसेवक राम चिवडे, प्रेमचंद कदम, साईप्रसाद उलीकडे, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, विद्यार्थी व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कचरामुक्त गाव मोहिम राबवणार
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविले जातात. परंतू जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून गावात दृष्यमान स्वच्छता दिसावी यासाठी कचरामुक्त मोहिम राबविण्याचा संकल्प केला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी यावेळी सांगलते. या उपक्रमाचा शुभारंभही त्यांनी पिंपळगावातून केला. गावात प्रवेश करतांना कुठेही कचरा दिवसणार नाही. वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणीच्या कच-याचे व्यवस्थापनही या मागची संकल्पना आहे. यासाठी सर्वांनी आठवडयातून किमान दोन तास स्वच्छतेसाठी वेळ द्यावा. माझी ओळख कचरामुक्त गाव करणा-या सीईओ म्हणून झाली पाहिजे, अशी माझी र्इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.