Meenal Karanwal : गाव कचरामुक्त ठेवण्याची ग्रामस्थानी जबाबदारीने पुढाकार घ्यावा – मीनल करनवाल -NNL
नांदेड। गाव कचरामुक्त ठेवण्याची सर्व ग्रामस्थानीची जबाबदारी असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले. स्वच्छता ही सेवा मोहिमे अंतर्गत आज लोहा तालुक्यातील पिंपळगाव येवला येथे घेण्यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर सरपंच तुळसाबाई गोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, रमेश पाटील तोनचिरे आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी दिले असले तरी, उघड्यावर कचरा टाकणे, उघडयावरील शौचविधी व पाण्याचे साचलेले डबक्यांमुळे गावातील वातरण प्रदूषित होते. जर यासाठी गावक-यांनी मिळून आठवड्यातून एकदा ग्रामसफाई कली जर परिसराची स्वच्छता होवून दूषित वातावरणामुळे पसरणारे रोग कमी होतील व नागरिेांचे आरोग्य सुधारेल असेही त...
