नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शहरी व ग्रामीण भागात सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या वतीने ढोल ताशा व गरबा दांडिया खेळात महिला व भाविक भक्तांनी ऊत्साहात विधीवत पुजन करून दुर्गा माता स्थापना केली.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरासह वाघाळा ,असदवन, असरजन, वसरणी, जुना कौठा, नवीन कौठा भागासह ग्रामीण भागातील विष्णुपूरी धनेगाव, वाजेगाव, गोपाळ चावडी, तुप्पा, कांकाडी, सह ग्रामीण भागात सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ यांनी ३ सप्टेंबर रोजी वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात दुर्गा माता कि जय घोषणा देत भव्य मिरवणूक काढली.
यावेळी सिडको परिसरातील वैष्णवी दुर्गा माता,नटराज दुर्गा माता,नवयुवक दुर्गा महोत्सव मंडळ नरहरी मंदिर सिडको,ओकांर दुर्गा माता,अयोध्या दुर्गा माता,रविवार बाजार हडको युवा शक्ती दुर्गा माता, हडको, नव छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा महोत्सव सिडको, अष्टविनायक दुर्गा माता महावीर चौक, सिडको, यांच्या सह अनेक मंडळानी नांदेड शहर व विविध जिल्ह्यातुन तर काही मंडळांनी परराज्यातून आकर्षक व सुबक अशा मोठ्या मुर्ती आणल्या.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शहरी १८व ग्रामीण १५ अशा सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून या व्यतिरीक विनापरवाना नवरात्र महोत्सव मंडळ यांनी ही दुर्गा माता स्थापन केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलंकर यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.