श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| १ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांचे व शेतजमिन, पशुधन शेतीउपयोगी औजारे व इतर साहित्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनाकडून अनुदान देण्याची मागणी तालुक्यातील उमरा वासीयांनी माहूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे उमरा शिवारातील नाल्या ओढ्यांना प्रचंड मोठा महापूर आल्याने उमरा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात महापुराचे पाणी वाहून गेल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे शेत खरडून गेले. तसेच गोठ्यावर बांधून असलेले पशुधन सुद्धा मृत्यू मुखी पडले. शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी औजारे व साहित्यांचे नुकसान झाले.

तसेच गावातील काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून या बाबीची तातडीने दखल घ्यावी व अतिवृष्टीने शेतातील पिकांचे व शेतजमिन, पशुधन शेतीउपयोगी औजारे व इतर साहित्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकरी व नागरिकांना शासनाकडून भरीव स्वरूपात अनुदान मिळवून देण्याची मागणी दि.३ सप्टेंबर रोजी माहूर तहसीलदारांना लेखी निवेदनातून उमरा येथील ग्रामस्थानी केली आहे.सदरील निवेदनावर पोलीस पाटील विठ्ठलराव देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव देशमुख,ग्रा.पं सरपंच आकाश धुर्वे,ग्रा.प.सदस्य विनायकराव देशमुख,दिगांबर धोतरे,बाजिराव देशमुख,सामाजिक कार्यकर्ते पवन गवळी यांच्या साक्षर्या आहेत.
