वाटसरूची लूटमार करणाऱ्या दोन दरोडेखोराच्या हिमायतनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या -NNL

0
हिमायतनगर तालुक्यात चाकुचा धाक दाखवुन मोटार सायकल आडवुन मोबाईल व पैसे जबरीने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना मुदखेड येथून अटक करण्यात आली. छयाचित्र - अनिल मादसवार

हिमायतनगर। राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण भागातील रस्त्याने ये – जा करणाऱ्या वाटसुरूची लूटमार करून मोबाईल पैसे घेऊन पोबारा करणाऱ्या दरोडेखोराना हिमायतनगर पोलिसांनी दोन मोबाईल, दुचाकी व नगदी रक्कम मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून मुसक्या आवळल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे, हि कार्यवाही पोलीस निरीक्षक शरद ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन हिमायतनगर तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 18/05/2024 रोजी फिर्यादी यांचे जबाबवरून पो.स्टे. गुरनं. 108/२०२४ कलम 392,341,34 भादंवि प्रमाणे हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 01/06/2024 रोजी पोलीस स्टेशन हिमायतनगर जि. नांदेड येथे चाकुचा धाक दाखवुन मोटार सायकल आडवुन मोबाईल व पैसे जबरीने चोरून अनोख्या पद्धतीने लपवून ठेवले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक शरद ज-हाड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपासिक अधिकारी व पोस्टेचे कर्मचारी यांनी दरोडयातील दोन चोरांना मुदखेड येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

नमुद गुन्हयातील अटक आरोपी यांना मुदखेड येथे पकडले.यावेळी दोन्ही आरोपीत यांना पो.स्टे हिमायतनगरला आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा नमुद अटक दोन आरोपी व त्यांचे इतर 04 साथीदारांनी केल्याचे कबुली दिली. त्यावरून दरोड्याच्या सदर गुन्हयात कलम 395 भादविची वाढ करण्यात आली आहे. आरोपींकडे विश्वासात घेवुन शिताफीने तपास केला असता आरोपींनी स्वखुशीने कबुली देवून एकूण 3 मोबाईल तसेच रोख रक्कम 3,800/-रु. काढून दिले आहेत.

यामध्ये 1 रिअलमी कंपनीचा मोबाईल, 1 रेडमी 5 जी कंपनीचा मोबाईल, 1 रेडमी कंपनीचा मोबाईल या मोबाईलचा समावेश आहे. तसेच रोख रक्कम 3,800/-रु. रिकव्हर करण्यात आलेली आहे. आरोपी यांनी जबरीने चोरी केलेले मोबाईल व हिश्याला आलेले पैसे नमुद अटक आरोपींनी त्यांचे स्वतःचे राहते घरी डब्यात व कपाटात लपवून ठेवलेले होते. सदर दरोड्यातील दरोडेखोरांचा तपास पोनि शरद ज-हाड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपासिक अधिकारी मपोउपनि निता कदम, सोबत पोलीस अंमलदार मसपोउपनि कागणे, पोहवा नागरगोजे, पोहवा पाटील, नापोशि चौदंते, मपोशि पवार यांनी केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीबद्दल सर्व स्तरयुन अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here