वाटसरूची लूटमार करणाऱ्या दोन दरोडेखोराच्या हिमायतनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या -NNL
हिमायतनगर। राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण भागातील रस्त्याने ये - जा करणाऱ्या वाटसुरूची लूटमार करून मोबाईल पैसे घेऊन पोबारा करणाऱ्या दरोडेखोराना हिमायतनगर पोलिसांनी दोन मोबाईल, दुचाकी व नगदी रक्कम मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून मुसक्या आवळल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे, हि कार्यवाही पोलीस निरीक्षक शरद ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.
पोलीस स्टेशन हिमायतनगर तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 18/05/2024 रोजी फिर्यादी यांचे जबाबवरून पो.स्टे. गुरनं. 108/२०२४ कलम 392,341,34 भादंवि प्रमाणे हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 01/06/2024 रोजी पोलीस स्टेशन हिमायतनगर जि. नांदेड येथे चाकुचा धाक दाखवुन मोटार सायकल आडवुन मोबाईल व पैसे...
