उस्माननगर l उस्माननगर व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन तसेच अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त परिसरातील कुटुंबांना तसेच घरपडी धारकांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सदस्य ,तथा माजी चेअरमन ,माजी सरपंच ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारकड गुरूजी
यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे व लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.


सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे उस्माननगर , शिराढोण , तेलंगवाडी , परिसरातील सर्वच सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यात शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच अनेक नागरिकांच्या घरे पडली , त्याच बरोबर शेतशिवारातील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील नदी नाल्याना पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतातील खरीपाचे पिके यामध्ये हाळद , सोयाबीन , भाजीपाला कापुस,आदी पिकांचे नुकसान झाले.


तसेच ढगफुटी धो धो पाडलेल्या पाण्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत, येथील सार्वजनिक स्मशानभुमी असून त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने फार मोठी पंचाईत होत आहे. पाऊस चालू असताना अंत्यसंस्कार करताना अनंत अडचणी भेडसावत आहेत. व आतील पेवरब्लॉक सुध्दा करणे गरजेचे आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.


ढगफुटी सदृश्य परिस्थितीत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे बैल , म्हैस , गाय मृत्यूमुखी पडले आहेत . अनेकांच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. तर अनेकांच्या शेतात पिका ऐवजी खडक पहाण्यात येत आहे. शासनाने अतिवृष्टीत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून मदत लवकर देण्याची पालकमंत्री व आमदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा राष्ट्रीय सदस्य तुकाराम वारकड गुरूजी यांनी पालकमंत्री अतुल सावे व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या केली. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी सरपंच वैजनाथ पाटील घोरबांड , तेलंगवाडीचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश मामा बास्टे , चेअरमन रूद्र वारकड , अमिन आदमनकर , आर आर घोरबांड , बि.पी.घोरबांड , बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

