Tukaram Warkad ; अतिवृष्टीग्रस्तांना लवकर मदत करा तुकाराम वारकड गुरूजी यांची पालकमंत्र्याकडे मागणी
उस्माननगर l उस्माननगर व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन तसेच अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त परिसरातील कुटुंबांना तसेच घरपडी धारकांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सदस्य ,तथा माजी चेअरमन ,माजी सरपंच ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारकड गुरूजी
यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे व लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे उस्माननगर , शिराढोण , तेलंगवाडी , परिसरातील सर्वच सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यात शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच अनेक नागरिकांच्या घरे पडली , त्याच बरोबर शेतशिवारातील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील नदी नाल्याना पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतातील खरीपाचे पिके यामध्य...
