देगलूर/शहापूर,गंगाधर मठवाले| शहापूर येथील पोस्टातून जनतेनी पैसे उचलण्यासाठी आलें असता दररोज केवळ एक लाख रुपये वाटपाचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी रिकाम्या हाताने परत जात आहेत. हि बाबा लक्षात घेऊन शासनाने उद्दिष्ठ वाढून देऊन किमान दोन लाख रुपये रोख वाटप करण्याची सुविधा द्यावी अशी मागणी जनतेतुन केली जात आहे.
देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर परिसरातील जवळपास दहा पंधरा गावांचे संपर्क असून, शासनाने वरच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अनूदान वाटप करण्याची योजना दाखल आहे. त्यातच लाडकि बहीण, योजना पंतप्रधान फसलं विमा योजना, मूख्यमंत्री योजना, निराधार लाभार्थी, श्रावण बाळं, पिक विमा, सोयाबीन व कापूस पिकाचे अनूदान असे वेगवेगळे प्रकारचे अनूदान शेतकरी जनतेला मिळत आहे.
त्यामुळे शेतकरी आणि लाभार्थी जनतेची गर्दी सॅन उत्सवाच्या काळामुळे वाढली आहे. एक एक लाभार्थ्यांच्या खात्यावर वीस ते पंचवीस हजार रुपये वाटप करण्यात येत असून, चार पाच लोकांना वाटप केले की पोस्टतून दररोज केवळ एक लाख रुपये रोख वाटप करण्याचे आदेश दिल्याने जनता शेतकरी पाच सहा किलोमीटर अंतरावर पायी आदळ अपट करुन हैराण होत आहेत. शेतीच काम बाजूला सारून पोस्टात येतात मात्र आलेंले पैसे वाटपाचे उदिष्ट संपल्याने शेतकरी जनता त्रस्त होऊन तोंड पांढरे करून घरचा रस्ता धरून जात आहेत.
तेव्हा वरिष्ठांनी यांची दखल घेऊन लाभार्थ्यांना आज ना उद्या अनुदान वाटप करावेच लागते तर उदिष्ट वाढून अनुदान वाटप कार्वे. जेणेकरून पोस्टात आलेल्या लोकांना परत जायची आवश्यकता भासणार नाही. जर लाभार्थ्यांना अडकून ठेवीचे असेल तर विविध योजनांची गरज काय..? असा सवाल शेतकऱ्यांना जनतेला पडतो आहे. जिल्हाधिकारी व शासनाच्या वरिष्ठानी यांची चौकशी करून एका दिवसात जेवढे शेतकरी जनता येथील त्या सर्वांना रक्कम मिळण्याची सोय पोस्टातून उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे.