हदगाव, शे.चांदपाशा| मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच लाभ घेण्यासाठी सुरुवातीला अधिवास प्रमाणपञ अवश्यक करण्यात आले होते. माञ आता लाभार्थी महीलेकडे आधिवासपञ उपलब्ध नसेल तरी चालणार आहे. त्या ऐवजी महीलाकडे १५ वर्षाच रेशन कार्ड जन्म दाखला मतदान ओळखपञ किवा शाळा सोडण्याचे प्रमाण पञ यापैकी ओळखपञ असल्यास ही ग्राहय धरले जाणार असल्याचे नंतर सरकार कडुन सागण्यात आले. तो पर्यत तलाठी नगरपालिका तहसिल कार्यालय मध्ये या करिता लाडकी बहीनीना या कार्यालयात कागदपञे काढण्या करिता अनेक समस्याचा सामना करावा लागला.


कार्यालयात ना पिण्याच्याच्या पाण्याची सोय ना बसण्याची सोय नाही घामाने लाडक्या बहीनी ओल चिंब झाल्याचे चिञ तलाठी नगरपालिका व तहसिल कार्यालय मध्ये पाहायावायस मिळत आहे. जन्मच्या दाखल्या करिता गर्दी होणार आहे. याची माहीती असतांना ही माञ संबंधित विभागाने या बाबतीत ठोस नियोजन दिसुन आलेल नाही. तहसिल कार्यालयाच्या प्रगाणांत शेड नसल्याने अनेक महीला उन्ह पावसात उभं राहव लागत आहे त्या सोबत छोट्या मुलांचे पण हाल होतांना दिसुन येत आहे.


अचानक योजना जाहीर झाली…अन् प्रशासनाची तारांबळ उडाली..
अगोदरच लोकसभेची निवडणूक संपली की विधानसभेच्या निवडणूकीत स्थानिय प्रशासन गुंतले असतांना अचानकपणे शासनाने ‘मुख्यमंञी माझी लाडकी बहीण ‘ही योजना जाहीर करण्यात आल्याने प्रशासनाची तारंबळ उडल्याचे चिञ दिसुन येत आहे. या योजनेची शेवटची तारीख 31आगष्ट आहे. त्यामुळे काही दिवस गार्दी कमी होईल अर्ज घेण्यासाठी व देण्यासाठी माणुष्यबळ अपुरे असल्याने प्रक्रियेस उशीर होतांना दिसुन येत आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे. यामुळे कर्मचारी व अधिका-या मध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याचे अस कर्मचारी व अधिका-याच्या बोलण्यावरुन दिसुनआले. या करिता एखादा पोलिस व मणुष्यबळ वाढविण्याची गरज ही अधिका-याच्या बोलण्यातून दिसुन आली.


विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ..
हदगाव तालुक्यातील शाळा महाविद्यालये चे शैक्षणिक सञ सुरु झालेल आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना तलाठी कार्यालय तहसिल कार्यालय उत्पन्नच प्रमाण पञ, जात -प्रमाण पञ, नाँनक्रिमेलेअर, अधिवास प्रमाणपञ, सेतु व तहसिल कार्यालला जाव लागत आहे. लाडकी बहीण योजने करिता प्रथम त्या ठिकाणी आलोट गर्दी मुळे अवश्यक प्रमाणपञ मिळण्यास प्रचंड प्रमाणात अडचणी येत आहे ही वस्तुस्थिती आहे.

दलांलचे आच्छे दिन..
हदगाव तहसिल कार्यालयकडून उत्पन्नाचे दिखले व इतर कागदापञे काढण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. लाडकी बहीण या योजने करिता या परिसरातील दलाल माञ सक्रिय झालेले आहे.
स्थानिय प्रशासना कडुन जनजागृती हवी..
लाडकी बहीण या योजनेत उत्पन्नाचे दाखले देण्याचे काय सुरु आहे. आता पर्यत किती महीलांना उत्पन्नाचे दाखले देण्यात आलेले आहे. हे प्रशासनाने स्थानिक माध्यमाना माहीती दिलेली नाही. तहसिलदार यांना माहीती घेण्याच वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकलेले नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तलाठी, ग्रामसेवक या योजनेची गावागावात जनजागृती करावी असे सांगण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी किंवा महीलानी खाजगी व्यकतीशी संपर्क करू नये असे अहवान उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.


