Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Diwali Pahat : दिवाळी पहाट कार्यक्रमात यावर्षीही नांदेडच्या रसिकांना संगीत मेजवानी
नांदेड मनोरंजन October 18, 2025

Diwali Pahat : दिवाळी पहाट कार्यक्रमात यावर्षीही नांदेडच्या रसिकांना संगीत मेजवानी

तीन दिवस सादर होणार्‍या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण-प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल
NNL TeamBy NNL TeamOctober 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बंदाघाट येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील दि.२० ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम हे यावर्षीचे दिवाळी पहाटचे आकर्षण असणार आहे.

दि.२० ऑक्टोंबर सकाळी साडेपाच वाजेपासून प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचे सुश्राव्यगायन होणार आहे. यात भावगिते, भक्तीगिते, चित्रपट गिते त्या सादर करणार आहेत. प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम असून ते स्वतः या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. सह गायक म्हणून रविंद्र आहिरे मुंबई हे देखील यात सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन बापू दासरी यांच्या पुढाकारातून रागरंग हा विविध वाद्य आणि गझल यांचे फ्युजन असलेला आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. यात मिलिंद तुळणकर-पुणे, कल्याणी देशपांडे-पुणे, प्रकाश सोनकांबळे, ऐनोद्दीन वासरी, डॉ.गुंजन शिरभाते, सौ.आसावरी जोशी (रवंदे), बालासाहेब पाटील हे मान्यवर कलावंत सहभागी होतील.

२० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका डॉ.सान्वी जेठवानी यांच्या संचाचा नृत्य झंकार हा कार्यक्रम सादर होणार आहे. शुभंम बिरकुरे व स्थानिक कलावंत यात सहभागी होतील. दि.२१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता प्रख्यात निवेदक प्रा.सुनिल नेरलकर यांच्या पुढाकारातून पं.जसराज यांच्या शिष्योत्तमा अंकिता जोशी यांचा शास्त्रीय संगीतावरील आधारीत स्वर सरिता हा कार्यक्रम होणार आहे. यात अभिनय रवंदे, प्रशांत गाजरे, विश्वजित कोलंबीकर, अनहद वारसी, चिन्मय मठपती, अदिती रवंदे व ईश्वरी जोशी हे सहकारी कलावंत सहभागी होतील.

बुधवार दि.२२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकारातून व पत्रकार विजय जोशी यांच्या निर्मितीतून १९६० ते १९८० या काळातील मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मराठी गितांचा रुपेरी सोनसळा हा कलांगण प्रतिष्ठाण प्रस्तूत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात प्रख्यात गायिका पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, सौ.कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, गायक सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी आदी मान्यवर गायक सहभागी होणार असून, या कार्यक्रमात वाद्यवृंदाची साथ राज लामटिळे, स्वप्नील धुळे, भगवानराव देशमुख, रविकुमार भद्रे, रतन चित्ते आदी करणार आहेत.

सायंकाळी साडेपाच वाजता नांदेडकरांना एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून व सुरेश जोंधळे व मकरंद दिवाकर यांच्या सहकार्यातून काफीला, कोल्हापूर निर्मित जियारत हा मराठी,हिंदी,उर्दू प्रेम साहित्यांची संगीतमय प्रेमयात्रा हा कार्यक्रम सादर होणार आहे. सतीश तांदळे यांचे दिग्दर्शन, संकलन व लेखन असलेला हा कार्यक्रम संगीतकार ऋषिकेश देशमाने यांच्या साह्याने रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण निखिल पुजारी आणि सतीश तांदळे हे करणार आहेत. तर कार्यक्रमात ओंकार पाटील, सुरज कांबळे, कौस्तुभ शिंदे आणि संपदा माने यांचे गायन होणार आहे. सर्व कार्यक्रम वेळेवर सुरु होणार असून, नांदेडच्या रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

उपस्थितांना नम्र विनंती व आवाहन
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने या कार्यक्रमात अतिवृष्टीग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कार्यक्रम स्थळी ठेवण्यात आलेल्या मदत पेटीत आपण सढळ हाताने मदत करावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

the Diwali Pahat program This year too to the lovers of Nanded will provide a musical feast
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMalegaon Yatra : माळेगाव यात्रेचे वैभव वाढवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज — आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
Next Article Meghna Sakore-Bordikar : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महिलांची पतसंस्था स्थापन करणे बाबतचा घेतला आढावा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

CIDCO ; सिडको परिसरा लगत असलेल्या ऑईल मिल मधील ‌काळी राख तात्काळ थांबावा

February 10, 2025

आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल – डॉ. नामदेवराव कराड -NNL

June 28, 2024

Rainfall : राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ अपेक्षित

September 25, 2025

police raid on illegal sand extraction ghat : अवैध्य वाळु उपसा करणाऱ्या घाटावर पोलिसांची धडक कारवाई २ कोटी ३९ लक्ष २० हजारच मुद्देमाल जप्त

February 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Cut down trees : गुंडवळ तलावाच्या बांधावरील झाडे तोडा: झाडे मोठी झाल्याने तलाव फुटण्याची शक्यता

farmers are deprived of remuneration | प्रशासकीय मान्यता मिळाली तरीही शेतकरी मोबदल्यापासून वंचित – NNL

Laxman Shakti Program : लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम श्रीक्षेत्र बोरगडी येथे शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबरला

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – रयत क्रांती संघटनेची मागणी -NNL

Short-term Employability Courses : अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?