हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील जेष्ठ पञकार यांच्या घरी चोरट्यांनी मंगळवारी राञी चोरट्यानी नगदी रक्कम सह सुमारे पाऊन लाखाचा माल चोरट्यांनी लंपास केला. या बाबतीत त्याच्या अर्जावरुन पोलीसानी अज्ञात चोरट्याच्या विरोधात हदगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, नुतन पोलिस निलक्षक यांनी नुकताच हदगाव पोलिस स्टेशनचा पदभार घेतला आहे त्यांना चोरट्यानी पञकाराचे घरी चोरी करुन एक प्रकारची सलामी दिल्याचे दिसुन येत आहे.
या बाबतीत थोडक्यात माहीती अशी की, पञकार बाळासाहेब पांडे हे दि.29जून ला ते आपल्या पत्नी व मुली सोबत नादेडला आले होते काही काम निमित ते आपल्या परिवारासह तिथेच थांबले. दि 30जुनच्या राञी घराचे कुलुप तोडुन चोरट्यानी नगदी रक्कम सहीत सोन्याचे मंगळसुञ सह इ. वस्तु चोरट्यानी चोरुन नेल्या आहेत. यामुळे या वार्डात नागरिकाच्या मनात घबराहटीचे वातावरण पसरलेले आहे. कारण पञकार बाळासाहेब पांडे याचे जिथे निवस्थान आहे. तो भाग गजबजलेला असुन हदगाव न.पा चे दोन माजी नगराध्यक्ष याच्या घराच्या बाजुलाच पञकार बाळासाहेब पांडे याचे निवस्थान आहे.
नव्या पोलिस निरक्षकाकडुन अपेक्षा …
हदगाव पोलिस स्टेशन अतर्गत आता पर्यत किती गुन्ह्याच तपास झाल किती गुन्हे उघडकीला आले. या बाबतीत दोन वर्षाच अवलोकन केल तर चोरीच्या गंभीय घटना बाबतीत फारसे पोलिस आश्या चोरीच्या घटनेत तपास समाधानकारक दिसुन येत नाही. दि 23 नोव्हेंबर 2023 च्या दरम्यान हदगाव पोलिस स्टेशन मागे काही अतरावर जि.प.शाळेतील शालेय पोषण आहार 17 कि.तादुळ.हरभरा वटाना मुगदाळ स्टील चे,भाडे गँस आदी वस्तु चोरीला गेल्या आहैत.
अश्या एक ना अनेक घटना घडलेल्या आहे. त्याचा तपास अध्याप लागत नाही केवळ गुन्ह्याची नोद होत असले तपास का होत नाही या मुळे शाळातील वस्तु व घराच्या चो-या सबधी तपास योग्यरित्या होत नसल्याने नागरिक ही सहसा पोलिस स्टेशन मध्ये तक्रारी करत नसल्याचे दिसुन येत आहे. परिणाम स्वरुप ह्या मुळेच चोरट्याच फावत आहे. आता नव्यानेच नविन पोलिस निरक्षक राजेश पुरी ह्याच्या कडुन नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. निश्चितच ते जे मरगळ हदगाव पोलिस स्टेशनला आलेली आहे. ती झटकून दुर करतील व नव्या जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.