श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या काळापासून बेसुमार वाळूची वाहतूक सुरु झाली होती,वाळू माफियांनी पैनगांगा नदीच्या पात्रात जागोजागी खड्डे करून अवैधपणे वाळू उत्खनन करून मोठ्यप्रमाणावर वाहतूक केली जात आहे,यामुळे महसूल विभागाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.शिवाय वाळूच्या अवास्तव किमतीमुळे सर्वसामान्यांना ही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.त्यामुळे या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
तहसीलदार माहूर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आज ता.एक रोजी सायफळ येथील पैनगंगा नदीतील ढगलाई घाटाकडे कडे जाणारा रस्ता खंदक खणून बंद केला आहे.यामुळे अनधिकृत रित्या होत असलेली वाळूच्या वाहतुकीवर नियंत्रण अवैध वाळू उत्खननावर आणि वाहतुकीवर अंकुश येईल,अशी अपेक्षा आहे.
निवडणुकीदरम्यान माफियांनी प्रशासनाचा कणभरही धाक न बाळगता दिवसाढवळ्या वाळु वाहतूक सुरु केली होती. वाळु माफिया संघटित प्रकारे गुन्हा करित असून कर्मचारी व प्रशासनावर राजकिय दबाव व अवैध संपत्तीच्या जोरावर दबावतंत्र वापरतात. परंतु यावेळी महसूल प्रशासनाने कडक कार्यवाहीचे पाऊल उचलायचे ठरवले.या सर्व समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाने यावर उपाययोजना म्हणुन घाटाकडे जाणारे मार्ग खड्डे करून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी तालुक्यातील निर्घटावर रात्रीच्या सुमारास धाड टाकून अनाधिकृत उत्खनन वाहतूक करणारे सहा वाहने जप्त केले होते.
त्यानंतर आता माहूर तहसील कार्यालयाचे प्रभारी तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड व त्यांच्या नेतृत्वा खालील पथकाने मागील दोन दिवसापासून वाळू माफीयांना साडो की पळो करून सोडले असून थोड्याफार प्रमाणात का असेना अनधिकृत वाळू चोरीवर नियंत्रण मिळाले आहे.शिवाय महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाने जर अनधिकृत वाळू विक्रीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्याचे ठरवलेच तर निश्चितच नियंत्रण मिळू शकते परंतु मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण अशी परिस्थिती सध्या माहूर तालुक्यात निर्माण झाली आहे.
वडसा,सायफळ येथील अनाधिकृत वाळू साठे जप्त… माहूर तालुक्यातील मौजे वडसा येथे परवा ग्राम महसूल अधिकारी ए.व्ही.कुडमते यांनी अवैधपणे साठवणूक करून ठेवण्यात आलेला अंदाजे ५० ब्रास इतका वाळू साठा जप्त करून स्थानिक कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला असून त्यासोबतच काल सायफळ येथील जुन्या गावात पहिल्यांदा नदीकाठी आठवणी ठेवण्यात आलेले अंदाजे ५० ते ५५ ब्रास चे वाळू साठे ग्राम महसूल अधिकारी राम ठाकरे, पोलीस पाटील हेमंत गावंडे, परीक्षा दिन ग्राम महसूल अधिकारी धनवे,उपसरपंच कपिल शेंडे इत्यादींच्या उपस्थितीत साठे जप्तीची कारवाई करण्यात आली.