नवीन नांदेड l ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड या शाळेमध्ये दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 रोजी पांढरी काठी दिनाच्या अनुषंगाने औरंगाबाद आकाशवाणी केंद्राचे उदघोषक नितीनजी देशपांडे लिखित मुले व फुले या ब्रेल लिपी पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहामध्ये निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड येथे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
पुस्तकाचे प्रकाशक मुख्याध्यापक बाबाराव इबितवार निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड होते हे प्रकाशन संस्थेचे संस्थापक सचिव विठ्ठलराव संभाजीराव गुटे यांच्या हस्ते करण्यात आले औरंगाबाद आकाशवाणीचे उदघोषक श्री नितीन देशपांडे हे मागील तीस वर्षापासून या शाळेला दरवर्षी काही ना काही तरी वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतात यावर्षी त्यांनी स्वतः कविता संग्रह लिहिला आहे आणि त्या कविता संग्रहाचं अंध मुलांसाठी ब्रेल लिपीतून अमरावती येथून पुस्तके छापून आणले आहे हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व शाळांना पुरवठा करण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे नितीन देशपांडे सातत्यानं बालमित्र मैत्रिणीसाठी लेखन करत आहेत रंजनातून शिक्षण हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे.
अंध मुला मुलींच्या जीवनातील आनंद आणखी वृंदिगत व्हावा या उद्देशाने त्यांनी मुले आणि फुले हा ब्रेल लिपीतील बालगीत संग्रह आपल्याला भेट दिला आहे सर्वांना जीवनदृष्टी देणारी निरागस बालक शिक्षक वृंद आणि पालकांना मुले आणि फुले हा बालगीत संग्रह निश्चित आवडेल नितीन देशपांडे यांच्या या अप्रतिम कलाकृती बद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखन कार्यास महाराष्ट्रातील सर्व अंध बांधवांनी व मित्र मंडळांनी मुख्याध्यापक निवासी अंध विद्यालय वसरणीच्या सर्व स्टाफ तर्फे त्यांना शुभेच्छा दिले आहेत.
या कार्यक्रमा साठी संस्थेचे सचिव व्ही एस गुट्टे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी स्थानी नितीन देशपांडे व त्यांच्या सुविध पत्नी सौ मंजिरीताई देशपांडे त्यांच्या कन्या कुमारी मेधा देशपांडे तसेच निवासी अंध विद्यालय बोधडी ता. किनवट या शाळेचे माजी मुख्याध्यापक सौ.जयश्री पांडे, अंध प्रवर्गातील समाजसेवक श्री इस्तारी इंगोले ज्ञानेश्वर आहेरे, मुंडे रामजी , कार्तिक दासरवार हे होते या निमित्ताने शाळेने विविध गुणांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. देशपांडे लिखित कवितासंग्रह त्यांच्या कविता शाळेचे संगीत शिक्षक पंकज शिरभाते यांनी संगीतबद्ध करून त्या मुलाने यावेळी गाऊन दाखवल्या तसेच विविध भाषणे या ठिकाणी सादर झाली.
देशपांडे बोलताना अंध विद्यालय म्हणजे माझ्यासाठी देवालय आहे या देवालया मध्ये दर्शनासाठी दरवर्षी मला आल्यानंतर वर्षभराची कार्य करण्याची शक्ती मिळते म्हणून मी दरवर्षी मी आणि माझे परिवार या देवालयाला दर्शन घेण्यासाठी येत असतो असे प्रतिपादन केले त्यांची कन्या कुमारी मेघा हे पुणे येथे एका कंपनीमध्ये इंजिनियर आहे.
त्यांनी या शाळेला दरवर्षी माझ्या मित्र व मैत्रिणी मधून एक टेक्निकल विषय घेऊन या विद्यार्थ्याला टेक्नॉलॉजीच प्रशिक्षण देण्याचं स्वप्न साकार करणार आहे असं सांगितलं व्ही .एस. गुटे यांनी आपले अध्यक्ष भाषणांमधून देशपांडे साहेबांच आभार मानलं आपली मदत म्हणजे ईश्वरीय मदत आहे असं सांगितलं यावेळी शासन प्रस्ताविक व आभार मुख्याध्यापक बाबाराव इबितवार यांनी केले कार्यक्रमाचा संचल संचालन रामराव जोजार यांनी केले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पाटील भास्कर. सुरेश होलबे, मनोज कलवले, बलभीम केंद्रे ,संतोष सावते, नामदेव इंगळे अधिक कर्मचाऱ्यांनी केले आहे.