नांदेड| बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते, त्यांचा इतिहास पंजाब सह भारतीयांना शक्तीबल आणि प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन बंदासिंघ बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशन चे अध्यक्ष कृष्णकांत बावा यांनी केले.


1708 मध्ये 3 सप्टेंबर रोजी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज आणि बाबा बंदासिंघ बहादूर यांची नांदेड येथे भेट झाल्याचा दिवस हा मिलाप दीन म्हणून साजरा केला जातो. हा मिलाप दिन साजरा करण्यासाठी लुधियाना एक जत्था नांदेड येथे आला होता. थाडी जत्थे, रागी, कवीशर, इतिहासकार यावेळी आपले विचार मांडले. गुरुद्वारा लंगर साहिब चे जथेदार संत बाबा बलविंदरसिंघ जी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार गुरुबचनसिंग शिलेदार, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे,माजी उपमहपौर सतीश देशमुख तरोडेकर, नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे,


सरदार रणजीतसिंग चिरागिया, सरदार जर्नलसिंघ गाडीवाले,हरियाणा फाउंडेशन चे अध्यक्ष उमराव सिंह छीना, यात्रा संयोजक तरलोचन सिंह बिलासपुर, इंद्रजीत सिंह ढिल्लो अध्यक्ष गुरुद्वारा कमेटी संढौरा , कवरदीप सिंह माछीवाड़ा, मोहन सिंह, कंचन बावा,प्रसिद्ध कथावाचक नाहर सिंह, गिलजोत सिंह अमृतसर, जगजीवन सिंह कैथल, रघवीर सिंह ढिल्लो सहायक सुपरिंटेंडेंट, बलविंदर सिंह फौजी, संत जगमीत सिंह, जरनैल सिंह, कैप्टन हरबंस सिंह गियासपुरा यांना विशेष सम्मानित करण्यात आले. नांदेड ते चपरचिडी हा बाबा बंदासिंघ बहादूर रस्ता तयार करावा. भारत सरकारने बाबा बंदासिंघ बहादूर यांच्या नावाने पंजाबमधून जलद ट्रेन चालवावी अशी मागणी बाबा बंदासिंघ बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार बावा यांनी केली आहे.


यावेळी अमनदीप बावा, अवि बावा, निर्मल सिंह दोराहा, रघवीर सिंह ढिल्लों, जगतार सिंह ढिल्लों, रिंकू ढिल्लों, दविंदर सिंह बिलासपुर, दीप लुधियानवी पंथक कवि, डॉ. रणजीत कौर, बेअंत सिंह बिलासपुर, दयाल सिंह दोराहा, जसपाल सिंह गियासपुर, गुरप्रीत सिंह, डॉ. सतविंदर सिंह, तरसेम सिंह, रमनदीप कौर, डॉ. जसबीर कौर, राजविंदर कौर राजी, हरि सिंह ढंडारी और मनविंदर सिंह दाखा आदि उपस्थित होते.


