किनवट, परमेश्वर पेशवे| शनिवारपेठ गावाजवळील बांधकाम केलेला पूल तुटल्यानंतर पुन्हा नळकांडी पूल तयार करण्यात आला. पुलावर डांबरीकरण अथवा सीसीकरण न केल्याने प्रवाशांना चिखलात त्रासदायक होत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग किनवट प्रशासनाच्या देखरेखीखाली या पूलाचे काम करण्यात आले. किमान पक्या दर्जाचा पूल व्हावा हि लोकांची अपेक्षा असून युवा ग्रामिण पत्रकार संघटनेच्या किनवट शाखेनेही दर्जेदार काम करुन लापरवाह केल्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी एका पत्रकाद्वारे केली आहे.
कोठारीपासून पार्डी-बोधडीकडे जाणार्या प्रमूख मार्गावरील शनिवारपेठ गावाजवळील नव्याने बांधलेल्या पुलाची वाताहत झाल्यानंतर त्याची पुन्हा थुकपाॅलीस करण्यात आली आहे. नळकांडी पुलावर निकृष्ठ दर्जाचा माती-मुरुम वापरल्यामुळे पावसाळ्यात चिखल होऊन प्रवाशांना त्रासाचे ठरले आहे. पंचवीस गावांचा हा एकमेव रस्ता अाहे. माजी आमदारांच्या पंधरा वर्षाच्या काळात या रस्त्याची वाट लावली होती. किमान विद्यमान आमदारांच्या आडीच वर्षाच्या काळात रस्ते विकासाची कामे होत असतांना सार्वजनिक बांधकाम किंवा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग असेल.
या प्रशासनाने कंत्राटदारांकडून पक्या दर्जाची कामे करुन घ्यायला हवीत. याच पुलावर सी.सी.करण किंवा डांबरीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. बाजुच्या भिंती बांधायला हव्यात. पुलावर कठडे बांधलेले नाही. यंत्रणेचे हे पाळीव कंत्राटदार असेल तर कामामध्ये तडजोड नको. त्यामुळे विकासाची वाट लावल्या जात असल्याचा ठपका ठेऊन अशा कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघाने केली आहे.