किनवट, परमेश्वर पेशवे| “खैर”प्रजातीचे दूर्मीळ बहूगुणी असलेल्या लाकडाची वाहतूक करणारे चार ट्रक इस्लापूरचे फिरते पथक आणि बोधडी वनपरिक्षेत्राच्या संयुक्त कार्यवाहीत पकडून सावरी डेपोत लावण्यात आली ही कार्यवाही २ आॅगस्टच्या रात्री १० वाजताचे आसपास जलधरा-इस्लापूर दरम्यानच्या हरीण खरबाजवळ करण्यात आली. पेंडलवाडा आदिलाबाद उनकेश्वर सारखणी किनवट बोधडी हिमायतनगर बोरगडी येथे हे लाकूड जाणार होते. परंतु तीन ऑगस्ट रोजी सदरच्या गाड्या सोडल्याचा दुजोरा खुद्द वन विभागाकडूनच मिळाला.
विशेषता या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी ही कारवाई करत असताना डेपो मध्ये चारही ट्रक आल्यानंतर ट्रकच्या या कार्यवाही संदर्भात ना ताबा पावती ना सोडते वेळेस ची सुपूर्द पावती न मोजमाप ना व्हिडिओ कॅमेरा कारवाई न केल्याने आता वनविभागाची कार्यवाही संशयाच्या भोवऱ्यात अडकली असल्याची चित्र पाहायला मिळत आहे. या कारवाई संदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खुद्द प्रतिनिधीने सावरी येथील डेपोला भेट दिली असतात त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यास कडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वरील धक्कादायक माहिती समोर आली पास व्यतिरिक्त या चारही ट्रकमध्ये जास्तीचा माल असल्याच्या संशयावरून इस्लापूर हरीण पठारापासून तब्बल 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरी येथील वन विभागाच्या डेपोमध्ये या चारही ट्रकला चौकशी संदर्भात आणण्यात आले.
पण या ट्रकची ताब्यात घेण्यात आल्यानंतर कुठली ताबा पावती करण्यात आली नाही. ना ट्रक सोडते वेळेस सुपूर्द पावती देण्यात आली नाही. न कुठल्याही प्रकारे ट्रक मधील लाकडांचे मोजमाप घेण्यात आले नाही. मग ट्रक पकडण्याचा व कार्यवाही करण्याचा केविलवाणा वन विभागाने का केला असावा त्यातच या प्रकरणात कारवाई करणारे फिरते पथकाचे वन अधिकारी केंद्रे व बोधडी येथील वन अधिकारी पोतुलवाड यांनी या कारवाई संदर्भात कमालीची गुप्तता पाळल्याने हे प्रकरण वनविभागाच्या अंगलट तर आले नाही अशी चर्चा सुद्धा ऐकावयास मिळत आहे. व संपूर्णच कारवाई ही संशयाच्या भोवऱ्यात आल्याचे चित्र सद्यस्थितीत पहावयास मिळत आहे.
काळी दौलत वनपरिक्षेत्रांतर्गतच्या गूंज परिमंडळ/वर्तूळ मधिल धनोडा येथिल वनोपज तपासणी नाक्यावर वनविभागाच्या पथकाने खैरच्या लाकडाने भरलेला एक ट्रक ९ जुलै रोजी रंगेहाथ पकडला. व कारवाई सुद्धा केली व त्यांना त्यामध्ये यश सुद्धा संपादन झाले. पण या कारवाई संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्याचे मौन का ? या दोन्ही वन अधिकाऱ्यांनी या ट्रक तपासणी प्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी केली असती तर अनेक बाबी उघड झाल्या असत्या असा सवाल आता किनवटवासी कडून सामोरे येत आहे. चौकशी संदर्भात भरून असलेली चारही ट्रक जशास तसे डेपो मध्ये आणणे व कुठलीही कार्यवाही न करता सोडून देणे हा या वीस वर्षाच्या कालावधीतला वन विभागातला पहिलाच प्रकार असावा असेही आता जणसामान्यतून बोलले जात आहे. सदरील प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी होणे अपेक्षित असल्याचे मत जाणकार मंडळीकडून ऐकायला मिळत आहे.