नांदेड | पीपल्स महाविद्यालय व्होकेशनल शाखेतील वर्ग बारावीचा विद्यार्थी तन्मय गजभारे याची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत तन्मय गजभारे या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले असून कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.


या स्पर्धेत तन्मय कॉलेजचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांनी तन्मयला मेडल प्रदान करून अभिनंदन केले. या प्रसंगी क्रीडा विभागप्रमुख प्रा. विलास वडजे, प्रा. डॉ. सुनिता माळी, प्रा. डॉ. राजेश सोनकांबळे आदी उपस्थित होते.


संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सी.ए.(डॉ.) प्रवीण पाटील, सचिव सौ. श्यामल पत्की, सहसचिव प्रफुल अग्रवाल, शालेय समिती अध्यक्ष ॲड. प्रदीप नागापूरकर, तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर, उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड, प्रा. डॉ. यशपाल भिंगे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. विलास वडजे, कार्यालयीन प्रमुख रोहिदास आडे, क्रीडा सदस्य प्रा. विजय कदम, डॉ. विनायक देव, व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तन्मयचे अभिनंदन केले.



