Saturday, July 4

Tag: World Soil Day celebrated with enthusiasm

Jaltara Shramdaan : जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ, जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा

Jaltara Shramdaan : जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ, जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा

कृषी, नांदेड
नांदेड| कंधार तालुक्यातील शिरशी खुर्द येथे जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आणि जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात तब्बल एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य त्यांनी जाहीर केले. “Catch the Rain – Where it Falls, When it Falls” या संकल्पनेला बळ देत पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवून भूजलस्तर वाढवणे, मृदा धूप रोखणे आणि उत्पादनक्षमता सुधारणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. हाय-इम्पॅक्ट वॉटरशेड प्रकल्पाचा प्रभाव मनरेगा व भारत रुरल लाइव्हलीहूड फाउंडेशन (BRLF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सहा तालुक्यांत मेगा वॉटरशेड प्रकल्प राबविला जात आहे. कंधार-मुखेड तालुक्यांमधील प्रकल्प अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था, कंधार यांच्या माध्यम...
error: Content is protected !!