World Hindi Day ; शिवाजी विद्यालयात जागतिक हिंदी दिन साजरा – NNL
नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेत जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील,तर प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षिका सौ.के. पी.पल्लेवाड,सौ.एस.आर बीरगे, बी.जी.हंबर्डे, ए.के.जांबकर, सौ.व्ही.यु.भाले, एस.ए.कोरडे,ए.डी. मोरे, जी.ए. जाधव, एन.पी.जाधव व डी.जी. पवार उपस्थित होते,यावेळी विद्यार्थ्यांनी विवीध हिंदी गीत सादर केले.
त्यानंतर सहशिक्षक बी.जी.हंबर्डे यांनी हिंदी विषयाचे महत्व विशद करतांना सांगीतले की भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. १० जानेवारीला देशभरात हिंदी दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारताशिवाय जगात असे अनेक देश आहेत जिथे हिंदी भाषिक लोक आहेत. हिंदी ही भारतातील एकमेव भाषा आहे जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि ईशान्येपासून गुजरातपर्यंत बोलली जाते. ह...
