Human Trafficking : जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा
नांदेड| जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त,महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाईल्ड लाईन व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड जिल्हामध्ये एक अभिसरण कार्यक्रम आज घेण्यात आला.
ज्यामध्ये बाल संरक्षण आणि बाल हक्क परिसंस्थेतील प्रमुख ,सर्व विभाग एकत्र आले होते. बाल तस्करीशी लढण्यासाठी समन्वित, आंतर-एजन्सी कृती आवश्यक आहे हे एकत्रितपणे ओळखून संवादात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात भाग घेतला. जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान नांदेड ही जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन मुलांचे संरक्षण, सुटका आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी नांदेड जिल्हामध्ये सक्रियपणे काम करत आहे.
जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन, यांनी बाल तस्करी रोखण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांना येणाऱ्या आव्हानांवर चर्चा करताना, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी विद्य...
