Sunday, May 17

Tag: Woman seriously injured

Wild Boar Attach : पळसा येथे महिलेवर रानडुकराचा हल्ला; महिला गंभीर जखमी

Wild Boar Attach : पळसा येथे महिलेवर रानडुकराचा हल्ला; महिला गंभीर जखमी

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव (गौतम वाठोरे) हदगाव तालुक्यातील पळसा येथे शेतात काम करत असताना एका महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात जनाबाई लक्ष्मीमन वालगोटवाड (वय ५५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. जनाबाई वालगोटवाड या शेतमजुरीचे काम करीत असून त्या आपल्या शेतात तूर कापणी करत असताना अचानक रानडुकराने त्यांच्या अंगावर झडप घातली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या आरडाओरडीनंतर शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेत रानडुकराला हुसकावून लावत त्यांना वाचवले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने नांदेड येथील विष्णुपुरी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती हदगाव येथील वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र घटनेनंतरही अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी जखमी महिलेची भेट घ...
attacked by wild animal : शेतात काम करणाऱ्या महिलेवर वन्य प्राण्याचा हल्ला; महिला गंभीर जखमी

attacked by wild animal : शेतात काम करणाऱ्या महिलेवर वन्य प्राण्याचा हल्ला; महिला गंभीर जखमी

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यातील मौजे बामनगुडा येथील शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर वन्य प्राण्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २३ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वन्य प्राण्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. माहूर व किनवट तालुका घनदाट जंगलाने व्यापलेला असून या परिसरात बिबट, अस्वल व अन्य वन्य प्राण्यांचा वावर आहे. मांडवी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बामनगुडा येथील शेतात लता सुरेश तोडसाम (वय ३५) या आपल्या पती, मुलगा व एका शेतशेजाऱ्यासोबत कापूस वेचण्याचे काम करीत होत्या. काही कामानिमित्त पती सुरेश तोडसाम घरी गेल्यानंतर शेताला लागून असलेल्या जंगलातून एका वन्य प्राण्याने अचानक झडप घालून महिलेवर हल्ला केला. या हल्ल्या...
error: Content is protected !!