Wednesday, May 13

Tag: with proper coordination

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून कामे केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल -NNL

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून कामे केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध विकासात्मक योजना गाव स्तरावर राबविण्यात येतात. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून कामे केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले. आज बुधवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यातील शिवपुरी येथील कोंडलिंगेश्वर मंदिर सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली समन्‍वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी परिविक्षाधीन आय.ए.एस. अधिकारी अनुष्का शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जल जीवन मिशनचे प्रकल्प ...
error: Content is protected !!