Vachan Sankalp Maharashtra started : नांदेड जिल्ह्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ -NNL
नांदेड| “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” वाचन पंधरवाडयानिमित्त नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन व वाचन सामूहिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हयातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली त्यामध्ये ग्रंथप्रदर्शन,वाचन कौशल्य कार्यशाळा निवडलेल्या पुस्तकांचे सामुहिक वाचन लेखन व विद्यार्थी यांच्या मधील वाचन संवाद कार्यक्रम,पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व राम मनोहर लोहिया सार्वजनिक वाचनालय,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या अभ्यासिकेत सामु...
