Rajiv mirajkar ; आकाशवाणीचे प्रशासकीय अधिकारी राजीव मिरजकर उद्या सेवानिवृत्त होणार -NNL
नांदेड। नांदेडच्या आकाशवाणी केंद्रातील प्रशासकीय अधिकारी राजीव पुंडलिकराव मिरजकर हे उद्या दि.३० सप्टेंबर रोजी नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांच्या मित्रमंडळाने व सहकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
१९८७ साली सांगली येथील आकाशवाणी केंद्रात लेखा विभागात त्यांची निवड स्टॉफ सलेक्शन कमिशन मधील यशस्वी परिक्षेनंतर झाली. सुरुवातीपासूनच सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा, कृषी, युवा समस्या याबद्दल विशेष रस घेणार्या राजीव मिरजकर यांनी सांगली येथून नांदेड आकाशवाणी केंद्रात १९९० साली बदली झाल्यानंतर तेंव्हापासून ते नांदेड आकाशवाणी केंद्रात कार्यरत आहेत.
सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या तसेच कला, क्रिडा, सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास असलेल्या राजीव मिरजकर यांनी नांदेड आकाशवाणी केंद्र लोकाभिमूख करण्यासाठी आपल्या सर्व सहकार्यांना वेळोवेळी मदत करुन व...
