Adv. Manikrao Kokate : खेळाडुंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील – क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
नांदेड| विद्यार्थ्यानी आपल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देत स्पष्ट ध्येय निश्चित करावे. अडचणींवर मात करून कला गुणांच्या वृद्धीसाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग वाढवावा. खेळाडूंसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासह निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. स्टेडियम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सव 2025-26 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत उपसंचालक (क्रीडा व युवक सेवा) लातूर विभाग कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, राष्ट्रीय सेवा योजना व माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपसंचालक महादेव कसगावडे, ज...
