Awareness ; विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमध्ये व्यापक जनजागृती -NNL
नांदेड। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी काल नांदेड जिल्हा परिषदेमध्ये मतदान जनजागृती साठी स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.
त्यांनी यावेळी लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डाॅ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यका...
