Friday, June 26

Tag: Water overflows from Ganjegaon bridge due to heavy rains

Vidarbha-Marathwada : मुसळधार आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे गांजेगाव पुलावरून पाणी; विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला

Vidarbha-Marathwada : मुसळधार आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे गांजेगाव पुलावरून पाणी; विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
हिमायतनगर, अनिल मादसवार| मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, गांजेगाव पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सलग विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला असून दळणवळण ठप्प झाले आहे. गांजेगाव पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली जातो आणि मार्ग बंद पडतो. नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी ३०–३५ किमी वळसा घ्यावा लागतो. मात्र अद्यापही पूल उंचावण्याची मंजुरी मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान - पैनगंगेत इसापूर धरणाचा विसर्ग आणि कयाधू नदीचा पुर मिसळल्याने आणि मुसळधार पावसामुळे नदीला महापूर येतो. यामुळे काठावरील शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. महत्त्वाचा मार्ग ठप्प - हा पूल विदर्भ–मराठवाडा–तेलंगणा–आंध्र प्रदेश–कर्नाटकला जोडणारा आहे. माहूर, बासर, पोहरा देवी आदी ...
error: Content is protected !!