Save the environment, save the trees : पर्यावरणाचा पळस पोळा, झाडे वाचवा, पर्यावरण टिकवा – वृक्षमित्र ना.वि.कदम यांचे आवाहन -NNL
नांदेड| येत्या ६ सप्टेंबर रोजी पोळा सणा निमित्ताने मेढीसाठी पळस व उबरांच्या फांद्या तोडून दारापुढे उभ्या करुन तोडून आणलेल्या फांदीची पूजा केली जाते व नैवद्ये ठेवला जातो या परंपरेबाबत गेली १२ वर्षे झाली खेड्यामध्ये, शहरामध्ये वयोवृध्द तज्ञ पंडीत अभ्या्सक यांना याबद्दल विचारले असता कोणतेही धार्मिक शास्त्रीय कारण कळाले नाही. यावर सर्वांचे उत्तर हेच आहे की, आमच्या आजोबा-पणजोबा पासुन आमचे वडील त्यांनी फांदी लावली म्हणून आम्ही लावतो तरी यामुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळून आपण पोळा सणानिमित्ताने एक झाडं लावण्याचा संकल्प करावा असे आवाहन वृक्षमित्र ना.वि.कदम यांनी केले आहे.
या विषयी अधिक माहीतीं देतांना ते म्हणाले की, या परंपरे प्रमाणे गावातील हजारो घरापुढे प्रत्येक चौकटीला ग्रामदेवतेला या फांद्या एका कुटूंबात १५ ते २० तोडल्या जातात. वृक्षतोडीमुळे प्रदुषित झालेल्या काळात ही प्रथा (रुढी) योग्य आ...
