आई – वडिलांच्या चरित्र वाचनातून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ. चासकर -NNL
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्रोत केंद्रामध्ये राष्ट्रीय वाचन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या शुभ हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व केरळ ग्रंथालय चळवळीचे जनक श्री. पी. एन. पन्नीकर यांच्या प्रतिमेस चंदनहार व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. चासकर यांनी राष्ट्रीय वाचन दिनाची शपथ दिली.
याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आई- वडिलांच्या चरित्र वाचनातून वाचन प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादनही त्यांनी...
