Vasantik Kathayan ; वासंतीक कथायन ने रसिक भारावले : करकाळा येथून कथाकथनाच्या नव्या पर्वाला सुरुवात
नांदेड l मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत मान सन्मानाचा ठरलेल्या कथाकथन या प्रकाराला उजाळा देण्यासाठी आणि कथाकथनाची परंपरा कायम ठेवण्यासाठी ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम यांच्या संकल्पनेतून काल रात्री उमरी तालुक्यातील करकाळा येथे वासंतीक कथायन हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्रातील पहिला ठरलेल्या या आगळ्यावेगळ्या कथायन कार्यक्रमाने रसिक भारावले होते.
श्री यशवंतराव ग्रामविकास प्रतिष्ठान करकळ्याच्या वतीने काल दिनांक 26 मार्च रोजी रात्री वासंतीक कथायन हा कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती मारोतराव कवळे गुरुजी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कथायनचे अध्यक्ष प्रा. शंकर विभुते यांच्यासह प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक देवदास फुलारी , विसाव्या लोकसंवाद मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. महेश मोरे , आयोजक दिगंबर कदम , सहभागी कथाकार राम तरटे अनुपमा ब...
