Poor quality Paver Blocks : राष्ट्रीय महामार्ग लगतच्या फूटपाथवर निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचा वापर!
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक 161 वरील कामावर पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कासवगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच, आता फूटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल करत दोन निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक तहसीलदारांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत
विशेष म्हणजे, या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत, अशी स्थानिक नागरिकांचीही तक्रार आहे. परिणामी, केवळ तीन वर्षांतच माहूर–किनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडल्या आहेत.
माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच...
