Friday, May 15

Tag: Unseasonal weather

Farmers losses : अवकाळी वातावरणाचा तूर पिकाला फटका; उतारा घटल्याने नुकसान

Farmers losses : अवकाळी वातावरणाचा तूर पिकाला फटका; उतारा घटल्याने नुकसान

नांदेड, कृषी, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात सध्या तूर पिकाच्या काढणीला वेग आला असला तरी बदलत्या हवामान व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी बांधवांमध्ये पिकांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांकडून घाईगडबडीत तूर काढणीची लगबग सुरू आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे उरलेल्या तुरीवर शेतकऱ्यांची मोठी आशा होती. मात्र प्रत्यक्षात तुरीचा उतारा मोठ्या प्रमाणात घटल्याने उत्पादनात लक्षणीय घसरण झाली आहे. परिणामी खरीपातील नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनले आहे. तूर पेरणी, तीन वेळची फवारणी, कापणी ते गोळा करणे, मळणी यंत्रातून बाहेर काढणे, ओलसर असल्याने वाळवणे आणि घरापर्यंत वाहतूक करणे यासाठी प्रति क्विंटल सुमारे 6 हजार रुपये खर्च येत आहे. मात्र बाजारात सध्...
error: Content is protected !!