सावरी घाटात ट्रक व मोटर सायकलची जोरदार धडक… धडकेत दोघांचा मृत्यू… ट्रकने घेतला पेट..ट्रक जळाला -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। धानोरा गावा जवळील सावरी घाटात एक ट्रक व मोटार सायकलची जोरदार रित्या धडक झाली असून या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना दि. 9 जून रविवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे. ही धडक एवढी गंभीर होती की या धडकेत ट्रकमध्ये मोटरसायकल अडकून ट्रकने पेट घेतला. व बघता बघता ट्रक मोठ्या प्रमाणावर जळाला आहे.
नांदेड ते किनवट जाणाऱ्या राज्य मार्गावरील धानोरा गावा जवळील सावरी घाटामध्ये बोधडी कडून एक मोटर सायकल व जलधारा कडून किनवट कडे जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. 26 बि.6198 या क्रमांकाच्या ट्रकचा व मोटार सायकलचा जोरदार रित्या धडक झाली. या धडकेत पेदा येथील रहिवासी असलेले माधव कारलेवाड वय 42 वर्ष व शिवाजी तिनलवाड वय 55 वर्ष हे दोघे मोटार सायकल वरून जलधारा कडे जात होते.
सावरी घाटात समोरून येणाऱ्या ट्रकची या दोघांना जोरदार रित्या धडक बसल्याने या धडकेत एका जणांचा ज...
