Formar mla pradeep naik ; नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन मतदारसंघ राखीव – माजी आमदार प्रदीप नाईक यांचा दावा -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्ह्यामधील दोन मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राखीव असल्याचा दावा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार संवाद बैठकी दरम्यान केला आहे.
मागील काही दिवसापूर्वी शरद पवार गटाच्या 88 जागेमध्ये किनवट माहूर मतदार संघाचे नाव नसल्याचे एका नामांकित वृत्तपत्रातून बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती आणि प्रदीप नाईक हे माननीय शरद पवार यांची भेट घेण्यासाठी तातडीने मुंबईला गेले असे सोशल मीडिया मधून वल्गना करण्यात आली होती.
त्यामुळे अनेक विरोधकांच्या मनामध्ये जणू काही नवविवाहित नवरदेवाच्या मनामध्ये जसे काही लड्डू फुटावे तसे किनवट तालुक्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती. "अब तो भाया गियो" असे म्हणत किनवट माहूर मतदार संघात आता आपलेच राज्य.. असे स्वप्न पाहणाऱ्याच्या तोंडचे आणि मी म्हणणाऱ्यांच्या मात्र तोंडाचे पाणी माजी आमदार प्रदीप नाईक या...
