Tukaram Mundhe ; दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पदी तुकाराम मुंढे यांची निवड
नांदेड l दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली आहे त्या विभागाच्या सचिव पदी आय.ए.एस. अधिकारी तुकाराम मुंढे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे या नियुक्ती बद्दल नांदेड जिल्ह्यातील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज आनंदोत्सव साजरा करून पेढे भरून जल्लोष साजरा केला आहे.
महाराष्ट्रातील दिव्यांगाना एक जगण्याचं बळ मिळावं त्यांच्यापर्यंत राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना पोहोचाव्या व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या दिव्यांग कल्याण विभागावर गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने नुकतीच आय.ए.एस असलेले तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील दिव्यांगांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.
...
